ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब - न्हिवे येथील श्री देव ब्राह्मण मंदिर सभामंडपासाठी १० लाख रु. निधी मंजूर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब - न्हिवे येथील श्री देव ब्राह्मण मंदिर सभामंडपासाठी १० लाख रु. निधी मंजूर.

प्रकाशन: 14 Oct 2024 04:14 PM
वाचन संख्या 88

आगामी विधानसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य देण्याचा न्हिवे वासियांचा निर्धार.

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कोळंब – न्हिवेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिराजवळ सभामंडप उभारावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकारी यांनी आमदार वैभव नाईक यांच्याजवळ केली होती. आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ याची दखल घेत १० लाख रु. निधी सभामंडपासाठी मंजूर करून दिला आहे. शुक्रवारी प्रत्यक्षात या कामाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले.

कोळंब – न्हिवेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होतो. मात्र या ठिकाणी सभामंडप नसल्याने धार्मिक कार्यक्रम तसेच भोजन व्यवस्था करताना बिकट स्थिती निर्माण व्हायची त्यामुळे श्री ब्राम्हणदेव मंदिर येथे सभामंडप उभारण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी अनेक लोकप्रतिनिधींकडे करून सुध्दा त्यांनी दुर्लक्ष केले होते.अखेर न्हिवेवाडी येथील युवकांनी, ग्रामस्थ व शिवसैनिकांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे सभामंडपाची मागणी केली असता निधी मंजुर करण्याचा शब्द देत त्यांनी तात्काळ या सभामंडपासाठी तब्बल १० रु. निधी मंजूर करून दिला त्याबद्दल ग्रामस्थांनी व शिवसैनिकांनी त्यांचे आभार मानत शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ. वैभव नाईक यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे. यावेळी सभामंडपासाठी जागा उपलब्ध करून देणारे संतोष परब यांचेही ग्रामस्थांनी आभार मानले.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी स्थानिक ग्रामस्थांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.आणि केवळ या सभामंडपाचे नव्हे तर मतदारसंघातील इतर अनेक विकासकामे येत्या काळात हाती घेऊन ती पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी नगरसेवक यतीन खोत,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरोसकर,शहर प्रमुख बाबी जोगी, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर,निखिल नेमळेकर, ग्रामपंचायत सदस्य नंदा बावकर, संजना शेलटकर, निकिता बागवे, स्वप्निल परब, संतोष परब, मीनल परब, राकेश लाड, रोशन नेमळेकर,प्रतीक पाताडे चेतन परब, स्वप्निल परब, स्वप्निल दळवी, गुणेश गांगण, देऊ परब, अभिमन्यू परब, राजन दळवी, श्रीपाद नेमळेकर, श्रीधर परब, शेखर पाताडे, निर्मला गांगण, वैशाली परब, रेश्मा परब, विनिता परब,अरुण दळवी, रसिका दळवी, वैदेही पाताडे, प्रज्ञा परब, ललिता लाड, दर्शना प्रभूगावकर, सुप्रिया लाड, प्रणिता परब, मीनल परब आदी ग्रामस्थ व शिवसैनिक ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स