सावंतवाडीत ३० ऑक्टोबरला खुली नरकासुर स्पर्धा.
मळगांव | नितीन गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या शिवतेज मिञमंडळ गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहरात नरकासुर स्पर्धा आयोजित करत असून यंदा हे स्पर्धेचे ६ वे वर्ष आहे. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी राञी ठिक ९ वाजता मोती तलावाच्या काठावर श्रीराम वाचन मंदीर सावंतवाडी ग्रंथालयाच्या समोरील जागेत अशा नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा खुल्या गटात घेण्यात येणार असून प्रथम येणाऱ्या तीन स्पर्धकांना व तीन उत्तेजनार्थ स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.
स्पर्धकांनी आपले नरकासुर ३० ऑक्टोबर २०२४ रोजी स्पर्धा स्थळी रात्री ठिक ९ ते ११ या वेळेतच आणायचे आहेत. रात्री ११ नंतर आलेल्या स्पर्धेकांचा स्पर्धेमध्ये समावेश केला जाणार नाही असे शिवतेज मित्रमंडळाकडून सांगण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)