शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पेंडूर विभागप्रमुख पदी शिवा भोजने.
आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र आणि केले अभिनंदन.
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पेंडूर विभागप्रमुख पदी शिवा भोजने यांची निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले
शिवसेना पेंडूर विभाग संघटना वाढीसाठी आपण प्रयत्न करून आमदार वैभव नाईक यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शिवा भोजने यांनी सांगितले. यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, मालवणचे माजी नगरसेवक यतीन खोत, पंकज वर्दम, रुपेश आमडोसकर, बाबू टेंबुलकर, राहुल परब, मोरजकर आणि पेंडुर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)