ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
स्वसंरक्षण ही काळाची गरज ; स्मृती कांदळगांवकर व शिल्पा खोत यांचे महिलांना मार्गदर्शन.

स्वसंरक्षण ही काळाची गरज ; स्मृती कांदळगांवकर व शिल्पा खोत यांचे महिलांना मार्गदर्शन.

प्रकाशन: 06 Oct 2024 05:02 PM
वाचन संख्या 202

मायमाऊली महिला सबलीकरण संस्था मालवण लायन्स क्लब यांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील देवज्ञ भवन येथे मायमाऊली महिला सबलीकरण संस्था मालवण आयोजीत लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या सहयोगाने संपन्न कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उद्योजिका, आरोग्य तज्ञ व समाजसेविका सौ. स्मृती महेश कांदळगांवकर व उद्योजिका, समाजसेविका व महिला नेत्या सौ. शिल्पा यतीन खोत यांनी महिलांना परखड मार्गदर्शन केले. महिला सबलीकरण संस्था मालवणच्या संस्थापिका सौ. फॅनी मार्शल फर्नांडिस, समाजसेविका सौ. स्वप्नाली नेरुरकर यांची या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून मंचावर उपस्थिती होती. ५ ऑक्टोबर रोजी हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला.

सौ. स्मृती महेश कांदळगांवकर.

सौ. शिल्पा यतीन खोत.

महिलांचे सबलीकरण हेच उज्वल भविष्याचे धोरण हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या मायमाऊली महिला सबलीकरण संस्था मालवण यांच्या वतीने आयोजीत या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ. स्मृती महेश कांदळगांवकर यांनी महिला सबल आहे याच्या जाणिव जागृतीविषयक संबोधन केले. समाजसेविका सौ. शिल्पा यतीन खोत यांनी छत्रपती शिवरायांचे स्त्री सन्मान संस्कार व जिजाऊंची विजिगीषू वृत्ती या बद्दल सर्वसामान्य स्त्रीमध्येही कसे चैतन्य चेतवता येते याबद्दल प्रेरक उद्बोधन केले. सौ. गौरी सातार्डेकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

सौ. फॅनी मार्शल फर्नांडिस. ( संस्थापक मायमाऊली महिला सबलीकरण संस्था मालवण व सचिव लायन्स क्लब ऑफ मालवण. )

या कार्यक्रमाला उपस्थित राह्यलेल्या मान्यवर व महिलांचे तसेच दैवज्ञ भवन पदाधिकारी सदस्यांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मिताली मोंडकर यांनी केले. यावेळी महिलांचे गरबा सादरीकरण व दीपक मोर्ये व जगदीश तोडकर यांचा कराओके लाईव्ह गायनाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. समाजसेवक विशाल ओटवणेकर यांचा या कार्यक्रमाला सहयोग होता.

या कार्यक्रमाला माय माऊली महिला सबलीकरण संस्था मालवण यांच्या संस्थापक सदस्या, लायन्स क्लब ऑफ मालवणच्या सदस्या आणि मालवणच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 15
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 321

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स