ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिद्धिविनायक गणपती मंदिर मुंबई न्यासाच्या सदस्यपदी मीना कांबळी.

सिद्धिविनायक गणपती मंदिर मुंबई न्यासाच्या सदस्यपदी मीना कांबळी.

प्रकाशन: 06 Oct 2024 01:27 AM
वाचन संख्या 80

मसुरे | प्रतिनिधी : प्रभादेवी मुंबई येथील श्री सिद्धिनायक गणपती मंदिर न्यासाच्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी मालवण तालुक्यातील रेवंडी गांवच्या आणि राजकीय महिला नेत्या मीना कांबळी यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मीना कांबळी यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे.

मीना कांबळी या मुंबई येथे शिवसेनेच्या महिला नेत्या म्हणून काम करत असून गेली अनेक वर्ष त्या सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांनी साई संस्थान शिर्डी या संस्थेच्या ट्रस्टी म्हणून काम केलेल आहे. अनेक संस्थांवरती त्या कार्यरत असून एक डॅशिंग महिला नेत्या म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. रेवंडी गावातही त्यांचे सामाजिक राजकीय कला क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या या निवडीबद्दल रेवंडी गावातून तसेच मुंबई येथून अभिनंदन होत आहे. यावेळी बोलताना मीना कांबळी म्हणाल्यात सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या सदस्य पदी निवड झाली हे आजवरच्या माझ्या कार्याचा गौरव असून मिळालेल्या संधीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी तसेच सिद्धिविनायक बाप्पाच्या भक्तांसाठी काम करणार असून सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाला अभिमान वाटेल असे कार्य माझ्या हातून घडेल.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 311

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स