ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
व्हॉईस ऑफ मीडियाच्या पाठ पुराव्यामुळे साप्ताहिके व 'क' दर्जाच्या वृत्तपत्रांना शासनाच्या जाहिराती.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या पाठ पुराव्यामुळे साप्ताहिके व 'क' दर्जाच्या वृत्तपत्रांना शासनाच्या जाहिराती.

प्रकाशन: 05 Oct 2024 11:14 AM
वाचन संख्या 137

मुंबई | प्रतिनिधी : पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी कार्यरत असलेल्या तसेच देशातील प्रथम क्रमांकाची पत्रकार संघटना अर्थात व्हॉईस ऑफ मीडियाने साप्ताहिके व ‘ क ‘ दर्जाच्या वृत्तपत्रांना शासकीय जाहिराती मिळाव्यात यासाठी वारंवार धरणे, आंदोलने , पत्रव्यवहार तसेच संबंधित मंत्री व अधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन हा प्रश्न ऐरणीवर आणला होता त्याला मोठे यश लाभले आहे. याबाबत राज्यातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागीय माहिती कार्यालय यांनी सर्व दैनिके व साप्ताहिके यातील जाहिरात व्यवस्थापकांना ३ ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून खुलासा केला आहे. पत्रात म्हटले आहे की, २०२४ – २५ या आर्थिक वर्षात विशेष प्रसिद्धी मोहिमेअंतर्गत शासकीय मान्यता यादीवरील लघु व मध्यम वर्गाच्या सर्व दैनिकात व साप्ताहिकांमधून पान क्रमांक तीनवर २५ % अतिरिक्त दराने जाहिरात प्रसिद्ध करावी. याबाबत त्यांनी वरिष्ठ सहाय्यक संचालक जाहिरात व प्रशासन यांनी दिलेला पत्राचा संदर्भही दिला आहे. पत्रात म्हटले आहे की ,२०२४-२५ या आर्थिक वर्षात विशेष प्रसिद्धी मोहिमेंतर्गत राज्यातील शासनमान्य यादीवरील मध्यमवर्गाच्या सर्व दैनिकात व साप्ताहिकात रंगीत ८०० सेमी तर लघु वर्गाच्या सर्व दैनिके व साप्ताहिकात कृष्णधवल ८०० सेमी आकाराची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी. दैनिकांनी दिनांक ४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करावी. साप्ताहिकांसाठी प्रसिद्धीचा कालावधी ४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर असा राहील. जिल्हा माहिती अधिकारी यांच्या नावे देयक संदर्भ देऊन तयार करावे. देवकांमध्ये जाहिरातीचा आदेश क्रमांक व दिनांक यांचा स्पष्ट उल्लेख असावा .आदेशाची झेरॉक्स प्रत सोबत जोडण्यात यावी. देयकाची जाहिरात प्रसिद्ध झालेल्या अंकासह देयक जिल्हा माहिती अधिकारी यांच्या पत्त्यावर पाठवावे. देयकाची तिसरी प्रत जाहिरात प्रसिद्ध केलेल्या अंकासह तातडीने जिल्हा उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालयाकडे पाठवावी.

दरम्यान हे जाहीर झाल्यावर राज्यातील अनेक साप्ताहिके व ‘ क ‘ दर्जाच्या वृत्तपत्राच्या संपादकांनी व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यातील पदाधिकारी व साप्ताहिक विंगच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 212

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स