दिविजा वृद्धाश्रमात पितृ पंधरवड्यात विविध लोकांच्या व संस्थांच्या दातृत्वाबद्दल आश्रमाच्या वतीने कृतज्ञता.
समाजसेवक विजय केसरकर यांची दिविजा आश्रमात सर्वपित्री अमावस्ये निमित्त पिंडदान व अन्नदान कार्यक्रमाला उपस्थिती.
सिंधुदुर्ग | निकेत पावसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे (ता. कणकवली) येथील दिविजा वृद्धाश्रमात दरवर्षी प्रमाणे सर्वपित्री निमित्त अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अगदी पारंपारिक पद्धतीने पिंडदानाचा कार्यक्रम केला गेले. यावेळी दिविजा वृद्धाश्रमात देवाज्ञा झालेल्या आजी आजोबांचा पिंडदान करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. या वृद्धाश्रमात दरवर्षी आपले सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. येथील आजी आजोबांना आपण आपल्या कुटुंबातच आहोत, याची जाणीव झाली पाहिजे. यासाठी या आश्रमाचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांच्या संकल्पनेतून आणि सर्व कर्मचारी यांच्या सहकार्यातून पारंपारिक सर्व सण साजरे केले जातात. आणि त्यामध्ये सर्व आजी आजोबा उत्साहात सहभागी होतात. नुकताच पितृ पंधरवडा संपला. त्यानिमित्त आपल्या वृद्ध मृत मित्र – मैत्रिणींची आठवण काढताना आजी आजोबांचे डोळे पाणावले गेले. त्यानंतर आश्रमातील सर्व आजी आजोबांना केळीच्या पानात पारंपारिक पद्धतीने जेवणाचा आस्वाद घ्यायला देण्यात आला.
पितृ पंधरवड्यानिमित्त या आजी आजोबांना अन्नदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळत, पितृ पंधरवड्यात आजी आजोबांना दररोज अन्नदाते मिळाले त्याबद्दल आश्रमाकडून संदेश शेट्ये यांनी आभार मानले.
यावेळी आश्रमातील सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी दिविजा वृद्धाश्रमात मृत पावलेल्या आजी आजोबांना पिंडदान केले व मृत आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना केली. सर्वपित्री अमावास्येला अन्नदान कार्यक्रमाला वारगांव विकास मंडळाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते विजय केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विजय केसरकर म्हणाले की, या वृद्धाश्रमातील आजी आजोबांची सर्व व्यवस्था पाहून खरंच समाधान वाटले. घरच्या प्रमाणे इथे हे सर्व आजी आजोबा एकत्र रमतात. वेळोवेळी योग्य ती त्यांची काळजी घेतली जाते. याबद्दल आश्रमाच्या व्यवस्थापनाचे आभार मानले पाहिजेत. शेवटच्या दिवशी बुधवारी सर्व आणि आजोबांना अन्नदान करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)