पळसंब गांवाच्या नवरात्रोत्सव कार्यक्रमातील स्पर्धांची रुपरेषा जाहीर.
श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ, पळसंब यांचे आयोजन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील श्री. आई जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान, पळसंब येथे नवरात्र उत्सव २०२४ निमित्त विविध स्पर्धांची रुपरेखा जाहीर झाली आहे. श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजीत नवरात्रीत्सवात यंदा महिला, मुले आणि मुलींसाठी भरघोस कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
उत्सव नवरात्रीचा खेळ पैठणीचा २०२४ कार्यक्रम रुपरेषा खालील प्रमाणे आहे.
१) ३ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी – चेंडू गोळा करणे.
२) ४ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी – बिस्किट खेळ.
३) ५ ऑक्टोबर रोजी रोजी महिलांसाठी संगीत खुर्ची.
५ ) ६ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी मडके फोडणे.
६ ) ७ ऑक्टोबर रोजी महिलासाठी बकेटमध्ये चेंडू टाकणे.
६ ) ८ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी चमचा गोटी.
७ ) ९ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी तळ्यात मळ्यात
८) १०रोजी महिलांसाठी वाटाणे गोळा करणे
९ ) ११ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी ग्लास मनोरे रचने व रांगोळी स्पर्धा वेळ ६ ते ८ व लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा
१०) १२ ऑक्टोबर रोजी चेंडूने बाटली पाडणे आणि पैठणी साठी अंतिम स्पर्धा.
सर्व स्पर्धा दररोज ९ :३० वेळेत चालू होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, क्रमांकासाठी खास आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या सर्व स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मंडळाचे सभासद श्री अक्षय परब मो. नंबर – 9405796133 व श्री. अमित पुजारे – 9420405914 यांच्याशी संपर्क साधुन नाव नोंदणी करावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .
या नवरात्रोत्सवातिल श्री आई जयंती देवी मंदिर व परिसराचे भक्ती पावित्र्य राखून व अत्यंत खिलाडूवृत्तीने या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे तसेच भाविक, प्रेक्षक व ग्रामस्थ यांनी जास्तीत जास्त सहभाग व लाभ घ्यावा असे आवाहन सहभाग श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब यांच्यावतीने यावेळी अध्यक्ष उल्हास सावंत, उपाध्यक्ष अमरेश पुजारे, सचिव चंद्रकांत गोलतकर, खजिनदार वैभव परब, शेखर पुजारे, अमित पुजारे, बबन पुजारे, अक्षय परब, रामकृष्ण पुजारे, रुपेश पुजारे, हितेश सावंत व सर्व पदाधिकारी सदस्य व सभासद यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)