मुख्याध्यापक माणिक वंजारे यांना महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार.
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर साळशी या प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांना त्यांच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सावंतवाडी येथे झालेल्या कास्ट्राईब शिक्षक संघटना – महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेत मा. निरंजन डावखरे (पदवीधर आमदार, कोकण) हे प्रमुख पाहुणे असणाऱ्या व माननीय श्री दिपक भाई केसरकर (मंत्री – शालेय शिक्षण व मराठी राजभाषा )हे उद्घाटक असणाऱ्या मंचावरील परिषदेत तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आकाश तांबे ,(अध्यक्ष – कास्ट्राईब शिक्षक संघटना- महाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या परिषदेस राज्यभरातून अनेक संघटना पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कार्यकर्ते इ. उपस्थित होते. मुख्याध्यापक माणिक वंजारे यांना मिळालेल्या महात्मा ज्योतिबा फुले – आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सत्यवान सावंत, स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान भोगले व इतर सर्व पदाधिकारी, सदस्य , ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)