नाटळ येथील ज्येष्ठ नागरीक मंगला राजाराम पांगम यांचे निधन.
कणकवली | ब्यूरो न्यूज : कणकवली तालुक्यातील नाटळ येथील रहिवासी मंगला राजाराम पांगम ( वय ८६ वर्षे ) यांचे शनिवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कणकवली येथील पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सुनील पांगम, गिरण व्यावसायिक रविकांत पांगम व नाटळ येथील संकेत गॅरेजचे मालक संतोष पांगम यांच्या त्या मातोश्री होत. तर सेवानिवृत्त आरोग्य सेविका स्नेहल पांगम व सोनाली पांगम यांच्या त्या सासू होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)