ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण एसटी स्टॅन्ड समोरील दुर्घटनेतील  महिलेचा मृत्यू.

मालवण एसटी स्टॅन्ड समोरील दुर्घटनेतील महिलेचा मृत्यू.

प्रकाशन: 25 Sep 2024 11:03 PM
वाचन संख्या 1537

मालवणात शोकाचे वातावरण.

मालवण | ब्युरो न्यूज : मालवण एसटी स्टॅन्ड समोरील एका वैद्यकीय परीक्षण आस्थापनेत काम करणाऱ्या, प्रीती केळुसकर या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतत तिला जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना आज २५ सप्टेंबरला बुधवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली होती. या महिलेला सिंधुदुर्ग नगरी ( ओरोस) येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे मालवण शहर व परिसरात शोक व्यक्त होत आहे. या घटनेतील संशयीताचा पोलीस शोध घेत आहेत.

आज दुपारी पेटलेल्या अवस्थेत ही महिला एसटी स्टॅन्ड समोरील रस्त्यावर येताच परिसरातील जागरुक नागरिकांनी धावाधाव करून या महिलेच्या अंगावरील आग विझवून तिला उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात नेले होते. येथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरु असताना रात्री तिचे निधन झाले. दिवंगत प्रीती केळुसकर ह्या उत्तम परिचारीका म्हणून ओळखल्या जायच्या व यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध सामाजिक मंचांवरुन श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स