बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे ठार.!
आत्महत्या की एनकाऊंटर याची पुष्टी नाही.
ब्युरो न्यूज | मुंबई : बदलापूरच्या शाळेतील अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि तो पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्याने आत्महत्या केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. घटनेत एका पोलीस कर्चचाऱ्यासह आरोपीचा प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे. ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून अक्षय शिंदे यानं तीन गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या. यावेळी त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील गोळी लागली असून हा पोलीस कर्मचारी देखील गंभीररित्या जखमी झाले आहेत तर काही सूत्रांकडून असे समजते की पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याचा एनकाऊंटर केला. १७ ऑगस्टपासून अक्षय शिंदे हा तुरुंगात होता.
बदलापूर येथील एका खासगी शाळेतील दोन, ४ वर्षीय मुलींवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या पीडीत मुलीच्या पालकांची तक्रार न घेता पोलिसांनी दिवसभर बसवून ठेवल्याने मोठा गदारोळ माजला होता. या विरोधात बदलापूरकर नागरिक मोठ्या संख्येने रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन केले होते. हे प्रकरण एनकाऊंटर आहे की आत्महत्या याबाबत सध्या ठोस माहिती देण्यात आलेली नाही आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)