ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मालवण आयटीआय येथे संविधान मंदिराचे उद्घाटन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण आयटीआय येथे संविधान मंदिराचे उद्घाटन.

प्रकाशन: 15 Sep 2024 06:32 PM
वाचन संख्या 117

मसुरे | प्रतिनिधी : औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण (आय टी आय) येथे संविधान मंदिराचे उदघाटन करण्यात आले. मालवण आयटीआयचे प्राचार्य सचिन संखे व मालवण तंत्रनिकेतन प्राचार्य पी. एस. शिरहदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्याने कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीना खरी सामाजिक न्यायाची शिकवण मिळावी यासाठी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील ४३४ शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (III) मध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. संविधान मंदिराचे उदघाटन उपराष्ट्रपती जगदिप धनखड़ यांच्या हस्ते आज १५ सप्टेंबर २०२४ रोजी ११ वाजता एलफिन्स्टन विद्यालय मुंबई येथून आभासी पदधतीने झाले.

संविधान मंदिरा बाबत जागरूकता आणण्यासाठी १२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२४ दरम्यान प्राचार्य सचिन संखे यांच्या निरीक्षणा खाली औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण, (ITI) जि. सिंधुदुर्ग येथे संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत निबंध स्पर्धा, रांगोळी सार्धा, वक्तृत्व स्पर्धा व ईतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जेणेकरून घटनात्मक अधिकार व कर्तव्या बहल जागरूकता संविधानाच्या दुरुस्त्या, कायदेशीर कलम, राज्यघटनेचे आकलन प्रशिक्षणार्थीनच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने केला गेला.
मालवण येथील उदघाटन कार्यक्रमास प्रमुख अतिथी प्राचार्य पी. एस. शिरहट्टी संस्थेतील कर्मचारी, आजी माजी प्रशिक्षणार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते, संविधान प्रेमी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स