ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील आरोपी जयदीप आपटेच्या पोलिस कोठडीत १३ सप्टेंबरपर्यंत वाढ.

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील आरोपी जयदीप आपटेच्या पोलिस कोठडीत १३ सप्टेंबरपर्यंत वाढ.

प्रकाशन: 10 Sep 2024 03:19 PM
वाचन संख्या 188

दुसरा संशयीत चेतन पाटीलची रवानगी न्यायालयीन कोठडीत.

मालवण | ब्युरो न्यूज : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचा ठेकेदार शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार चेतन पाटील यांना आज दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यात आपटे याला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तर पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात येणार आहे.

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने या दोघांनाही कडेकोट पोलीस बंदोबस्तात येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याची अजून चौकशी करायची असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी त्याला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तर चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

जयदीप आपटे याची पूर्ण चौकशी झालेली नाही. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा पोलिसांकडून तपास व्हायचा आहे.तसेच लॅपटॉप अन्य साहित्य जप्त करायचे आहे. यांसह अन्य बाबींवर युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने जयदीप आपटे याला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी पोलीस या प्रकरणाच्या तपासासाठी त्याला पुन्हा ताब्यात घेऊ शकतात असेही ॲड. भणगे यांनी स्पष्ट केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 281

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स