मालवणात अपघातात अज्ञात ठार..!
मालवण | ब्युरो न्यूज : मालवण शहरातील देऊळवाडा मार्गांवर वाहन अंगावरून गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी साडेसात दरम्यन घडली.
दरम्यान, वाहना मुळे अपघात झाला ते वाहन नेमके कोणते? याबाबत चर्चा सुरु होत्या. बस अंगावरून गेली अशीही चर्चा सुरु होती. एसटी अधिकारीही त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र अपघात बस मुळे झाला याची खात्री झाली नव्हती. मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला. अधिक माहिती घेणे सुरु आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
फोटो सौजन्य | मालवण ब्यूरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)