ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रियाज खान आक्रमक ; स्वच्छता निरीक्षक बी टी जाधव यांना विचारला जाब.

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रियाज खान आक्रमक ; स्वच्छता निरीक्षक बी टी जाधव यांना विचारला जाब.

प्रकाशन: 01 Sep 2024 10:06 PM
वाचन संख्या 92

बांदा | राकेश परब : सध्या बांदा शहरात सातत्याने डेंग्यूचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे . नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान आणि ग्रामस्थांनी बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्रात धड़क देत स्वच्छता निरीक्षक बी टी जाधव यांना धारेवर धरत जाब विचारला. श्री गणेश चतुर्थी अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपल्याने साथीच्या रोगाच्या पार्श्रभूमीवर आरोग्य विभागाने काय उपाययोजना केल्यात असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी श्री रियाज खान यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांच्याशी चर्चा केली.

श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर औषध साठा किती शिल्लक आहे. बाहेरून येणाच्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यासाठी बसस्थानक, पोलीस तपासरणी नाका येथे आरोग्य पथक तैनात करण्यातबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी विवेक गवस, प्रसाद परब, विजय बांदेकर, संजय गावडे, दत्ताराम बांदेकर, बेळगावकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स