कोलगांव येथे दोन एसटी बसची धडक
दोन्ही गाड्यांचे नुकसान : प्रवासी सुरक्षित
सावंतवाडी, दि.२८ ऑगस्ट
कणकवलीतून सावंतवाडीच्या दिशेने येणारी कणकवली डेपोची एसटी बस व सावंतवाडीतून कुडाळच्या दिशेने जाणारी कुडाळ डेपोची बस या दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणीही प्रवासी जखमी झाले नाहीत तर दोन्ही गाड्यांचे चालक देखील सुखरूप आहेत. दुपारी दीडच्या सुमारास कोलगाव तिठा येथे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)