ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बदलापूर अत्याचार प्रकरणी मालवणात आत्मक्लेश आंदोलन..!

बदलापूर अत्याचार प्रकरणी मालवणात आत्मक्लेश आंदोलन..!

प्रकाशन: 24 Aug 2024 04:52 PM
वाचन संख्या 64

मालवण : बदलापूर येथे प्रशालेत शिकणाऱ्या ४ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निंदनीय घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी मालवणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी व युवतीसेनेच्या वतीने फोवकांडा पिंपळ इथे आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात आले आहे. यावेळी राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत महिला, विद्यार्थिनींनी स्वाक्षऱ्या करत या आंदोलनाला पाठिंबा दिला.महिलांना सुरक्षा मिळत नसल्याबाबत व अत्याचारातील आरोपीना तात्काळ शिक्षा मिळत नसल्याबाबत यावेळी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, पंधराशे रुपये नको… सुरक्षा द्या अशा घोषणा यावेळी सहभागी महिलांनी दिल्या. यावेळी पदाधिकारी पूनम चव्हाण, दीपा शिंदे, सेजल परब, निनाक्षी मेथर, सूर्वी लोणे,माधुरी प्रभू, तृप्ती मयेकर, रूपा कुडाळकर, रविना लुडबे, लक्ष्मी शिरसेकर, भारती आडकर आदी व इतर महिला आघाडी व युवतीसेनेच्या कार्यकर्त्या आणि तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, मंदार ओरसकर, अमेय देसाई, संमेश परब, नरेश हुले, मोंडकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स