ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'त्यांच्या'तील वादाचे कोकणातील जनतेला काही देणे घेणे नाही फक्त महामार्ग  लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'त्यांच्या'तील वादाचे कोकणातील जनतेला काही देणे घेणे नाही फक्त महामार्ग लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे…!

प्रकाशन: 22 Aug 2024 10:06 AM
वाचन संख्या 184

आमदार वैभव नाईक यांची मंत्री रवींद्र चव्हाण व रामदास कदम यांच्या वादाबाबत टिकात्मक प्रतिक्रिया.

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी मंत्री रवींद्र चव्हाण व रामदास कदम वादावर प्रतिक्रिया देताना म्हणले की, पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे कोकणातले मंत्री आहेत. त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. परंतु त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण न झाल्यामुळे चाकरमानी, पर्यटक, व्यावसायिक या सगळ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अपूर्णावस्थेत असलेल्या महामार्गाचा तोटा सिंधुदुर्गला होत आहे. गतवर्षीच्या गणेशोत्सवात हा महामार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम या दोन नेत्यांमध्ये काय वाद आहे यात आम्हाला किंवा कोकणातील जनतेला काही देणेघेणे नाही. लवकरात लवकर महामार्ग सुरू झाला पाहिजे.अशी टीकात्मक प्रतिक्रिया देखील आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

ज्याप्रमाणे दोन नेते एकमेकांवर आरोप करत आहेत त्यावरून त्या दोन पक्षात आणि सरकारमध्ये एकवाक्यता नाही हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. सरकारमध्ये एक वाक्यता नसल्यामुळे कोकणचा विकास त्यांच्याकडून होऊ शकत नाही. निवडणुकीत कोकणामध्ये पैसे वाटप करून आणि लोकांची दिशाभूल केल्यामुळेच त्यांना विजय मिळाला आहे. आता मात्र कोकणची जनता सुज्ञ झाली आहे. जनता याचा नक्कीच अभ्यास करेल. विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनता पुन्हा एकदा शिवसेनेच्या पाठिशी राहील असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स