उबाठा शिवसेनेच्या पुढाकाराने रस्त्यांचे काम मार्गावर !
मालवण शहरांमधील रस्ते पावसामुळे खड्डेमय झालेले असून नागरिकांची खड्ड्यांमुळे गैरसोय होत होती. तेव्हा शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,जिल्हा प्रवक्ते मंदार केली,माजी नगरसेवक आणि बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या नेतृत्वाखाली पी डब्ल्यूडीचे अधिकारी यांना रस्त्याच्या दुर्दशेबाबत निवेदन देण्यात आले होते.
या निवेदनाची अंमलबजावणी म्हणून फोवकांडा पिंपळ ते देऊळवाडा पूल येथील रस्त्यांचे काम सुरू झाले आहे.पीडब्लयूडी खात्याकडून मालवण शहरातील हे खड्डेमय रस्ते दुरुस्त करण्यात येत आहेत. रस्ते दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू केल्या बाबत नागरिक आणि उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून रस्ते व बांधकाम खात्याचे आभार मानले गेले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)