ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
Mhada lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या 2000 घरांसाठी लॉटरी, पगार कमी असला तरी लहान तोंडी मोठा घास घ्यायची संधी
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

Mhada lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या 2000 घरांसाठी लॉटरी, पगार कमी असला तरी लहान तोंडी मोठा घास घ्यायची संधी

प्रकाशन: 08 Aug 2024 05:08 PM
वाचन संख्या 201

Mumbai News: सर्वसामान्यांचं मुंबईत हक्काचं घर विकत घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार. म्हाडाकडून मुंबईतील http://localhost/news/public/uploads/2030 घरांसाठी लॉटरी. मुंबई उपनगरात मोक्याच्या ठिकाणी कमी पैशांमध्ये स्वत:चं घर विकत घेण्याची संधी.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या http://localhost/news/public/uploads/2030 घरांच्या सोडतीचा कार्यक्रम म्हाडाने बुधवारी अधिकृतपणे जाहीर केला. शुक्रवारपासून म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर 13 सप्टेंबरला म्हाडाच्या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाईल. म्हाडाच्या या लॉटरीत मुंबईतील तब्बल http://localhost/news/public/uploads/2000 घरांचा समावेश असल्याने मुंबईकरांसाठी चांगली संधी चालून आली आहे. https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर या लॉटरीबाबत सर्व माहिती जाणून घेता येईल.

म्हाडाची घरे मुंबईतील कोणत्या भागात?

म्हाडाकडून ज्या http://localhost/news/public/uploads/2030 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे, त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरं उपलब्ध आहेत. मुंबई उपनगरातील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड याठिकाणी म्हाडाची घरे आहेत. म्हाडाच्या लॉटरीसाठी नेहमीप्रमाणे अत्यल्प (6 लाख), अल्प (9 लाख), मध्यम (12 लाख), उच्च उत्पन्न गट म्हणजे 12 लाखांपेक्षा अधिक असे उत्पन्ननिहाय गट करण्यात आले आहेत.

मध्यमवर्गीयांना लहान तोंडी मोठा घास घेण्याची संधी

मुंबईतील म्हाडाची घरं विकत घेणाऱ्यांचे वार्षिक उत्पन्नानुसार गट करण्यात आले आहेत. मात्र, एखाद्या व्यक्तीला त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या गटातील घर विकत घ्यायचे असेल तर तशीही संधी म्हाडाने उपलब्ध करुन दिली आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मात्र, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. त्यांना मध्यम, अल्प किंवा अत्यल्प गटातील घर विकत घेता येणार नाही.

म्हाडाच्या अर्जाची किंमत किती?

अर्ज शुल्क ₹ ५००/- + जीएसटी @ १८% ₹९०/- एकूण ₹ ५९०/- अर्ज शुल्क विना परतावा

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स