ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बोटाच्या क्लिकवर उपलब्ध ज्ञानाचा योग्य वापर विद्यार्थ्यांनी करावा ; सुप्रसिद्ध वाॅटरस्पोर्टस उद्योजक श्री. अजित आचरेकर यांचे मार्गदर्शन.

बोटाच्या क्लिकवर उपलब्ध ज्ञानाचा योग्य वापर विद्यार्थ्यांनी करावा ; सुप्रसिद्ध वाॅटरस्पोर्टस उद्योजक श्री. अजित आचरेकर यांचे मार्गदर्शन.

प्रकाशन: 27 Jul 2024 12:46 AM
वाचन संख्या 79

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा.

मालवण | प्रतिनिधी : माणुस हा कायम विद्यार्थी असतो आपले शिक्षण हे कधीच संपत नाही आणि संपणारेही नाही आज जग बोटाच्या एका क्कीलवर जवळ आले आहे ज्ञानाची अनेक व्दारेही खुली झाल्याने विद्यार्थ्यांनी या ज्ञानाचा योग्य वापर करून यश संपादन करावे असे प्रतिपादन अजित वॉटरस्पोर्ट्सचे उद्योजक अजित आचरेकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर, युवा उद्योजक अजित आचरेकर, ब्ल्यू लाईन्स रेफ्रिजरेशनचे मालक उद्योजक अनंत मयेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, मुख्याध्यापक एच. बी. तिवले सर, एमएसएटी (आयबीटी) च्या नेहा गवंडे, दर्शना मयेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई हे उपस्थित होते.

यावेळी अनंत मयेकर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडताना त्यात करिअर करा असे सांगितले तर वामन खोत यांनी एखाद्या क्षेत्रात करियर करण्यासाठी त्या क्षेत्राची आवड पाहिजे, आवडीच्या क्षेत्रात उतरणे हीच खरी मनुष्याची प्रगती असते, तुमच्या आवडी व तुमच्यातील कौशल्य प्रत्येक टप्प्यानुसार विकसित करत राहा असे ते म्हणाले

यावेळी श्री. खोत सर यांच्या हस्ते अजित आचरेकर यांचा तर श्री. हेरेकर यांच्या हस्ते अनंत मयेकर यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी नेहा गवंडे यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 296

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स