भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून वायरीतील वेंगुर्लेकर कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात.
मालवण | ब्युरो न्यूज : भाजपा नेते निलेश राणे यांनी मालवण तालुक्यातील वायरी भुतनाथ येथील श्री. प्रदीप वेंगुर्लेकर कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. मुसळधार पावसात श्री. वेंगुर्लेकर यांच्या घराशेजारी असलेला वडाचा वृक्ष कोसळल्याची घटना चार दिवसांपूर्वी मध्यरात्री घडली होती घराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी गुरुवारी वेंगुर्लेकर कुटुंबियांची भेट घेत नुकसानीची माहिती घेतली. भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आर्थिक मदत दर्शन प्रदीप वेंगुर्लेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, भाजपा पदाधिकारी केदार झाड, देवानंद लोकेगांवकर, राम चोपडेकर, जयवंत सावंत, सातार्डेकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)