ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
विरण येथे न्याय आपल्या दारी कार्यक्रम.!

विरण येथे न्याय आपल्या दारी कार्यक्रम.!

प्रकाशन: 20 Oct 2021 07:37 PM
वाचन संख्या 36

माननीय न्यायाधीशांनी दिली कायद्याची माहिती

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत असताना कित्येक नागरिकांना लोकोपयोगी कायद्याविषयी माहितीच नसल्याचे वस्तुस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने अखिल भारतीय संपर्क व जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत असताना कित्येक नागरिकांना लोकोपयोगी कायद्या विषयी माहितीच नसल्याचे वस्तुस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने अखिल भारतीय संपर्क व जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत मालवण न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश न्या. आदित्य नाईक, सह अधीक्षक अशोक टेमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मसदे चुनवरे ग्रामपंचायत कार्यालय येथे न्याय आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आझादी का अमृत महोत्सव या नावाने २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत सदर मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
कायद्या मुळे नागरिकांना असलेले हक्क , कायद्या अंतर्गत जबाबदाऱ्याची जाणीव असणे, विविध लोकोपयोगी सरकारी योजना इत्यादींची माहिती यावेळी नागरिकाना देण्यात आली.
यावेळी सरपंच सौ श्रेया परब, उपसरपंच कलाधर कुशे, जि प सदस्य अनिल कांदळकर, ग्रामसेवक एम. एम. कुणकवळेकर, मुख्य सेविका स्नेहा सामंत, सदस्या शमिका वाडकर, धनश्री कांदळकर, अनिल जाधव, अंकुश नेरकर, माजी सरपंच दत्ताराम आंबेरकर आदी सह अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स