ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मातृसंस्थेचे ॠण कधी विसरु नका ; ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री. साबाजी करलकर.

मातृसंस्थेचे ॠण कधी विसरु नका ; ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री. साबाजी करलकर.

प्रकाशन: 17 Jul 2024 03:12 PM
वाचन संख्या 167

मालवण येथील भंडारी ए सो हायस्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

मालवण | प्रतिनिधी : ज्या शाळेने ज्ञानदाना सोबत संस्कारक्षम शिक्षण दिले ती शाळा आपली मातृसंस्था असल्याने या मातृसंस्थेचे ऋण विद्यार्थ्यांनी कधी विसरू नये. जिद्द, मेहनत आणि कष्ट करण्याची ताकद यातून विद्यार्थ्यांनी यश संपादन करतानाच आपल्या शाळेचा, संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण भंडारी येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी, बारावी परीक्षेतील तसेच शिष्यवृत्ती, एनएमएमएस परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे काऊन्सील ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी वामन खोत, जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, प्रा. रुपेश बांदेकर उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुख्याध्यापक एच. बी. तिवले यांनी स्वागत केले. तर आर. डी. बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वामन खोत यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे, त्या क्षेत्रात आपण टॉपर कसे राहू त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, हे प्रयत्न सफल होण्यासाठी मनात जिद्द बाळगली पाहिजे, विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने ज्ञान ग्रहण करून यश संपादन करावे, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी तर आभार प्रदर्शन संदीप अवसरे यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 311

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स