रियाज ख़ान यांच्या प्रयत्नाने बांदा बस स्थानकाला मिळाली साउंड सिस्टीम.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा बस स्थानकांत साउंड सिस्टीम मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज ख़ान यांनी निवेदन देऊन मागणी केली होती. बांदा बस स्थानकांत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तसेच प्रवाशी असल्याने सुचनेसाठी साउंड सिस्टीम ची आवश्यकता होती. साउंड सिस्टीम मिळावी यासाठी खान यांनी निवेदन देऊन वारंवार पाठपुरावा केल्यामुळेच बस स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी साऊंड सिस्टीम उपलब्ध झाली आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)