ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रोटरी क्लब ऑफ बांदा यांचा  पदग्रहण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न.

रोटरी क्लब ऑफ बांदा यांचा पदग्रहण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न.

प्रकाशन: 13 Jul 2024 09:00 PM
वाचन संख्या 120

बांदा | राकेश परब : रोटरी क्लब ऑफ बांदा, यांचा तिसरा पदग्रहण सोहळा बुधवारी संपन्न झाला. यावेळी रो. सिताराम गावडे यांनी अध्यक्षपदाचा तर रो. शिवानंद भिडे यांनी सचिव पदाची आणि स्वप्निल धामापुरकर यांनी खजिनदार पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आनंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले .

श्री स्वामी समर्थ हॉलमध्ये आयोजीत या समारंभात प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आनंद कुलकर्णी माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो राजेश घाटवळ , डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो प्रणय तेली , असिस्टंट गव्हर्नर रो महादेव पाटकर, असिस्टंट गव्हर्नर रो डॉक्टर विद्याधर तायशेटे हे उपस्थित होते. रोटरीचे संस्थापक पॉल हॅरिस यांना अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमात लांबर कुटुंबीय यांना शेती मधून व्यवसाय निर्मती करून यशस्वी व्यावसायिक म्हणून पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर श्रीकृष्ण शिरसाट यांनी कठीण काळात हलाकीचे दिवस काडून त्यावर मात करत उद्योग धंद्यात आपले व कुटुंबाचे नाव केले यासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर गुणवंत विद्यार्थी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तर गरजू विद्यार्थि यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

मावळते अध्यक्ष प्रमोद कामत यांचे कौतुक करताना त्यांनी केलेल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सामाजिक, शैक्षणिक, आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला.

नूतन अध्यक्ष श्री सीताराम गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, रोटरी क्लब ऑफ बांदा अध्यक्ष म्हणून निश्चितच भरीव असे कार्य करण्याचे आपला उद्देश आहे त्यामध्ये मला अनेक मान्यवरांचा आशीर्वाद मिळेल तसेच तुमचा सर्वांच्या सहकार्याने आपण आपल्या क्लब ची समाजसेवेची चालत आलेली यशस्वी परंपरा यापुढे चालू ठेवू असे प्रतिपादन केले.

यावेळी माजी अध्यक्ष प्रमोद कामत यांचा माजी डिस्टिक गव्हर्नर आनंद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आपण एक वर्षाच्या कालावधीत प्रकल्प राबवत असताना सर्व रोटरी सदस्य यांनी आपल्याला मोलाची साथ दिली, मी अध्यक्ष म्हणून नाही तर आम्ही रोटरी सदस्य हे सगळेच अध्यक्ष आहोत असे मिळून आम्ही काम केले. अध्यक्ष म्हणून काम करत असताना लोकांच्या अनेक अडचणी आमच्या समोर आल्या आणि रोटरीच्या माध्यमातून त्यांना मदत करायचे भाग्य लाभले तसेच संस्थापक अध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून सहकार्य केले असे सांगून मावळते अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानून त्यांनी नवीन अध्यक्षांना शुभेच्या दिल्या. यावेळी राजेश घाटवळ, प्रणय तेली, महादेव पाटकर, डॉक्टर विद्याधर तायशेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
    
यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष भाजपा व जी प सदस्य श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक , ग्रामंचायत सदस्य श्रेया केसरकर, बँक ऑफ इंडिया बांदा व्यवस्थापक पवन कुलकर्णी, संस्थापक अध्यक्ष मंदार कल्याणकर, सुदन केसरकर, सिद्धेश पावसकर, आबा धारगळकर, दिलीप कोरगावकर, सुधीर शिरसाट, आपा चिंदरकर, फिरोज खान, बाबा काणेकर, घनश्याम पावसकर, संतोष सावंत, डॉ. नारायण नाईक, विराज परब, दिगंबर गायतोंडे, स्वागत नाटेकर, सचिन मुळीक, तुषार धामापुरकर, रत्नाकर आगलावे, स्वप्नील धामापूरकर, प्रवीण शिरसाट, सुनील राऊळ, वसंत राऊळ, दिलीप घोगळे, प्रसाद सातार्डेकर ,आनंद दिवस
अनंत नाडकर्णी ,डॉ. प्रसाद कोकाटे, योगेश परुळेकर, हनुमंत  शिरोडकर, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर , मिताली सावंत, ईश्वरी कल्याणकर आणि जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी रोटरीयन उपस्थित होते.

यावेळी रोटरी क्लब बांदा या परिवारात रवी गवस यांना नवीन सदस्य म्हणून सामील करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वागत नाटेकर व संतोष सावंत यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 438

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स