ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा जिल्हा प्रवक्ते विष्णू मोंडकर यांनी अर्थसंकल्पाबाबत राज्य सरकारवर दाखवला विश्वास    ; विरोधक नामोहरम झाल्याचीही व्यक्त केली प्रतिक्रिया.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा जिल्हा प्रवक्ते विष्णू मोंडकर यांनी अर्थसंकल्पाबाबत राज्य सरकारवर दाखवला विश्वास ; विरोधक नामोहरम झाल्याचीही व्यक्त केली प्रतिक्रिया.

प्रकाशन: 30 Jun 2024 05:18 PM
वाचन संख्या 143

मालवण | प्रतिनिधी : भाजप सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते श्री. विष्णू मोंडकर यांनी राज्य अर्थसंकल्पाची एका प्रसिद्धी पत्राद्वारे पाठराखण केली आहे. राज्य अर्थसंकल्पाबाबत विष्णू मोंडकर म्हणतात की, लोकसभा निवडणुकीत कोकणातील जनतेने पाचही खासदार निवडून देऊन महायुतीस साथ दिली राज्य सरकारच्या वतीने राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणातील जनतेच्या मनातील विकासपर्वाची आश्वासक पूर्तता केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी च्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे मनोबल खचले असून त्यांच्या पायाखालील जमीन सरकली आहे. त्यांचा भ्रमनिरास होऊन जनतेची दिशाभूल करणारी विधाने त्यांच्या कडून केली जात आहेत.

राज्याच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत सागरी पर्यटन विकासाच्या दृष्टीने आंतराष्ट्रीय स्कुबाडायव्हिंग स्कुल साठी २० कोटी तसेच तसेच पर्यटन पाणबुडी प्रकल्पाला ६६ कोटी मंजुरी, कातळ शिल्प संवर्धना साठी युनोस्को कडे पाठपुरावा तसेच उद्योग विकास केंद्रासाठी भरीव तरतूद आई योजनेच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या महिला व्यावसायिकांसाठी व्याज माफी ,आर्थिक दुर्बल गटातील महिलासाठी मोफत असे तीन गॅस सिलेंडर, शेतकऱ्याच्या दूध उत्पादन वाढीसाठी प्रति लिटर ५ रुपये मदत,बचत गटाच्या निधीत १५ हजार रुपये वरून ३० हजार रुपये वाढ केली असून व्यवसाययिक शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी ८ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटूंबिक उत्पन्न असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना १००% प्रतिपूर्ती करण्याची मंजुरी दिली . तसेच वन्य प्राणी पासून जीवित हानीस नुकसान भरपाई २५ लाख रुपयापर्यंत वाढविण्यात आली आहे.

महिला व बालकांविरुद्ध अत्याचाराचे खटले साठी १०० विशेष जलदगती न्यायालयाची आवश्यक निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे शेतकरी वर्गासाठी ७.५ अश्वशक्ती क्षमतेच्या शेती पपांना मोफत वीज पुरविली जाणार आहे तसेच मागेल त्याला सौरऊर्जा पम्प उपलब्ध केले जाणार आहेत तसेच सगळ्यात महत्वाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनची अंबालबजावणी २१ ते ६० वर्षापर्यंत पात्र महिला भगिनीस दरमहा १५०० रुपये दिले जाणार असून महिला वर्गासाठी सम्मान योजना राबविली जाणार आहे.महायुतीचे नेते खासदार श्री नारायणजी राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ,जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री श्री दिपकजी केसरकर तसेच आमदार श्री नितेश राणे यांच्या सहकार्याने जनतेस अपेक्षित असलेला हा अर्थ संकल्प जनतेच्या मनातील आशा अपेक्षा पूर्ण करणारा ठरणारा असून येणाऱ्या विधानसभेत महायुतीचे म्हणजे सर्व सामन्याचे सरकार निर्विवाद बहुमताने बनेल असा विश्वास श्री विष्णू मोंडकर भाजपा प्रवक्ते सिंधुदुर्ग यांनी व्यक्त केला आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स