ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसदे येथून बेपत्ता युवक आठ वर्षांनी सापडला ; मालवण पोलिसांचे शोधकार्य.

मसदे येथून बेपत्ता युवक आठ वर्षांनी सापडला ; मालवण पोलिसांचे शोधकार्य.

प्रकाशन: 20 Jun 2024 05:42 PM
वाचन संख्या 195

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मसदे येथून प्रशांत विठ्ठल मसदेकर हा २६ वर्षीय युवक बेपत्ता होता. मालवण पोलिसांच्या शोधकार्या नंतर तब्बल आठ वर्षांनी तो सापडला आहे. प्रशांत हा २०१६ सालात घरातून निघून गेला होता. त्याचा कुठेही शोध न लागल्याने मालवण पोलीस ठाण्यात प्रशांत बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांचा शोध सूरू होता. दरम्यानच्या काळात प्रशांत याचा कुठेही शोध लागला नाही. मात्र सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, प्रमोद नाईक, विवेक फरांदे यांनी बेपत्ता व्यक्तीच्या शोध बाबत सूरू ठेवलेल्या तपास कार्या दरम्यान प्रशांत मसदेकर याचा फेसबुकवर शोध लागला. त्याला फ्रेंड रिक्वेस्ट टाकून तसेच त्याचा मोबाईल नंबर मिळवून लोकेशन मिळवले. कोल्हापूर करवीर येथे त्याचा पत्ता सापडून आला.

मालवण पोलिस ठाणे येथे आल्यावर प्रशांत याची अधिक चौकशी केली असता कामाच्या शोधात कोल्हापूर येथे होतो. कामं मिळाल्यानंतर तेथील सहकाऱ्यांसोबत राहात होतो. एवढेच त्याने पोलिसांना सांगितले. मात्र घरी असलेल्या वडिल, बहिण यांना एवढी वर्षे का संपर्क केला नाही याची विचारणा केल्यावरही कामाच्या शोधात तो बाहेर असल्याचे त्याने सांगितले.

प्रशांत याचे वडिल व नातेवाईक पोलीस ठाण्यात आले. त्यांच्या सोबत प्रशांत घरी गेला. मात्र काही दिवसांनी कामानिमित्त पुन्हा कोल्हापूर किंवा अन्य ठिकाणी जाणार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 439

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स