ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण तालुक्यातल्या       दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव ; आर. जी. चव्हाण हाॅल येथे संपन्न होईल सोहळा.

मालवण तालुक्यातल्या दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव ; आर. जी. चव्हाण हाॅल येथे संपन्न होईल सोहळा.

प्रकाशन: 18 Jun 2024 03:50 PM
वाचन संख्या 183

आमदार वैभव नाईक व मालवण युवासेनेच्या वतीने आयोजन.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील सर्व माध्यमिक व आणि उच्च माध्यमिक प्रशालांमध्ये इयत्ता दहावी, बारावी (शाखा निहाय प्रथम ३) परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आमदार वैभव नाईक व युवासेना मालवणच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी २२ जून २०२४ रोजी दुपारी ३.००. वाजता आर. जी. चव्हाण हॉल वायरी रोड तानाजी नाका येथे हा गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे.

या सोहळ्यात आमदार वैभव नाईक, उपनेत्या जान्हवी सावंत,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, नितिन वाळके, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, मंदार केणी,महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, देवयानी मसुरकर, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, दीपा शिंदे, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, शहरप्रमुख रश्मी परुळेकर, युवतीसेना प्रमुख अधिकारी शिल्पा यतीन खोत, युवासेना तालुकाप्रमूख मंदार गावडे, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, युवतीसेना तालुकाप्रमुख नीनाक्षी शिंदे, शहरप्रमुख सूर्वि लोणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.

तरी मालवण तालुक्यातील सर्व शासकीय व खाजगी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांनी गुणगौरव सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन मालवण तालुका युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 440

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स