ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या ६२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये झाली नोकरीसाठी निवड..!

मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या ६२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये झाली नोकरीसाठी निवड..!

प्रकाशन: 06 Jun 2024 06:13 PM
वाचन संख्या 661

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या ६२ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली. पुणे येथील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनीने इलेक्ट्रिकल शाखेच्या २ तर इलेक्ट्राॅनिक्सच्या ११ विद्यार्थ्यांची निवड केली. जॉन डीअर या कंपनी मध्ये इलेक्ट्रोनिक्स ०१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. टाटा मोटर्स मध्ये इलेक्ट्रिकल २ इलेक्ट्राॅनिक्स ०४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जीई एविएशन पुणे या कंपनीत इलेक्ट्रिकलच्या ०५ विद्यार्थ्यांची निवड झाली तसेच लक्ष्मी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर मध्ये सिविल च्या ११ विद्यार्थ्यांची निवड आली. हिकव्हीजन कंपनी कडून इलेक्ट्रिकलच्या ०९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कर्मिस इंडिया लिमिटेड मध्ये इलेक्ट्रिकल ०३ इलेक्ट्रोनिक्स-१० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आदित्य बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये मेकॅनिकलच्या ०३ तर गंद्रीजल पुणे येथे इलेक्ट्रोनिक्सच्या ०६ विद्यार्थ्यांची निवड झाली तसेच जीई एरोस्पेस पुणे या कंपनीत मेकॅनिकलच्या ०९ विद्यार्थ्यांची निवड झाली.

सद्यस्थितीमध्ये विविध नामवंत कंपन्या फिलिप्स हेल्थकेअर पुणे, लार्सन & टुब्रो मुंबई, फ्लश इलेक्ट्रोनिक्स, KSPG ऑटो, ह्या कंपन्यानी ऑनलाइन पद्धतीने नियुक्तीसाठी भाग नोंदलेला आहे. संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षणाकडे कल वाढत असून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. संस्थेच्या कामगिरीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा राहिला आहे.

या निवडीसाठी संस्थेचे प्राचार्य डॉ. एस ए. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखतीद्वारे निवडीसाठी इलेक्ट्रोनिक्स बिभाग प्रमुख तथा प्रशिक्षण व अस्थापना अधिकारी डॉ. संजय चोपडे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच इतर सर्व शाखांचे विभाग प्रमुख व विभागातील प्लेसमेंट अधिकारी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी प्रयत्न करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स