ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी राॅक गार्डन मधील सुविधांच्या देखभाली साठी प्रशासकांकडे वेळ नसल्याची केली टीका..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी राॅक गार्डन मधील सुविधांच्या देखभाली साठी प्रशासकांकडे वेळ नसल्याची केली टीका..!

प्रकाशन: 21 May 2024 05:18 AM
वाचन संख्या 240

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी मालवणातील राॅक गार्डन मधील सुविधांच्या देखभाली विषयक प्रशासकावर टीका केली असून, लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत ‘प्रशासकावर अंकुश ठेवायचा तर कोणी ठेवायचा’, अशी विचारणा केली आहे.

एका प्रसिद्धी पत्राद्वारे महेश कांदळगांवकर यांनी नमूद केले आहे की मागील दोन आठवड्यांपासून पर्यटक तसेच चाकरमानी मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. त्यांची सिंधुदुर्ग किल्ला , स्कुबा, वॉटर स्पोर्ट्स याला पर्यटकांची पसंती आहेच पण त्याच बरोबर मालवण शहरात समुद्रकिनारी असलेले रॉक गार्डनला पण असंख्य पर्यटक भेट देत आहेत. तसेच मालवण शहरातील नागरिक, चाकरमानी यांची पण रॉक गार्डन ला पसंती आहे. लोकप्रतिनिधीनी आपापल्या कालावधी मधे या रॉक गार्डन ची प्रसिद्धी वाढविण्याचे प्रयत्न केलेले आहेत. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व सहकारी यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून कालवधीमध्ये कोकण पट्ट्यात नाही असा एकमेव फाउंटन या रॉक गार्डन मध्ये बसविण्यात आला. लहान मुलांसाठी खेळणी, बोटिंगची व्यवस्था करण्यात आली . त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची पसंती आहेच पण त्याचबरोबर स्थानिकाची पण पसंती आहे. पण याच्या देखभाल दुरुस्तीकडे बघायला सध्या प्रशासकाकडे वेळ नाही अशी खंत महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

सध्या प्रचंड गर्दी असताना रविवार सारख्या दिवशी याठिकाणी लाईट बंद , फाउंटन बंद अशी परिस्तिथी आहे. गार्डन बघायला येणाऱ्या व्यक्ती कडून पाच रुपये प्रवेश फी घेतली जाते ज्या पासून नगर परिषदेला लाखो रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे असा तिकीट काउंटर पण रविवार सारख्या दिवशी बंद ठेवला जातो . बोटिंग मागील दोन अडीज वर्षे बंद आहे. टॉयलेट व्यवस्था अपुरी पडत असल्याने याठिकाणी आमच्या कालवधीत सुमारे २५ लाख खर्च करुन घेण्यात आलेल्या पाच गाडयापैकी एक गाडी आणून ठेवण्याबाबत दोन वर्षापासून सुचित करूनही कुठलीही कार्यवाही नाही. हे सगळं म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातंय अशी परिस्तिथी झालेली आहे. लोकप्रतिनिधीनी सूचना करूनही शहर विकासाच्या कुठल्याही बाबतीत प्रशासकाची अनास्था आहे. त्याच्या वर कोणाचाही अंकुश नाही हेच अधोरिखित होत आहे.

लोकप्रतिनिधी यथाशक्ती शहराचा विकास होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात पण ज्याना कोणाला शहराच्या विकासाचे काही देणे घेणे नसते असा एखादा अधिकारी विकासकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन जर शहराची वाट लावत असेल तर त्याच्या वर लोकप्रतिनिधीच्या गैरहजेरीत कोण अंकुश ठेवणार हे एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असा पुनुरुच्चार देखील महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स