ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिडको बद्दल गैरसमज पसरवणार्या उ. बा. ठा. ची विजयाची स्वप्ने जनता धुळीस मिळवणार : श्री विष्णू मोंडकर ( जिल्हा प्रवक्ते, भाजप)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिडको बद्दल गैरसमज पसरवणार्या उ. बा. ठा. ची विजयाची स्वप्ने जनता धुळीस मिळवणार : श्री विष्णू मोंडकर ( जिल्हा प्रवक्ते, भाजप)

प्रकाशन: 05 May 2024 06:13 PM
वाचन संख्या 89

कोकणचे भाग्यविधाता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भरघोस मतांनी निवडून आणून जनता प्रत्येक वेळी गैरसमज पसरवणार्या विनायक राऊत यांना घरी बसवेल असाही जाहीर केला विश्वास.

सिंधुदुर्ग : भाजपा जिल्हा प्रवक्ते श्री. विष्णू मोंडकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांना जनता घरी बसवणार असल्याचा विश्वास एका प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर केला आहे. मोंडकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे की उ बा. ठा चे उमेदवार खासदार विनायक राऊत आणि त्यांचे समर्थक सातत्याने लोकसभा निवडणुकी मध्ये महायुतीच्या विरोधात अपप्रचार करत असून सातत्याने जिल्हातील जनतेला भावनिक करून आपली राक्षसी महत्वकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सिडको महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकार जिल्ह्यातील जागा परप्रांतियाच्या घशात घालणार असे श्री विनायक राऊत आणि त्याचे दिशाहीन कार्यकर्ते सर्वत्र जाऊन सांगत आहेत. वास्तविक स्थिती वेगळी असून अशा प्रकारची कुठलेही प्रकारचे संपादन प्रक्रिया सुरु झाली नसून, फक्त जनतेला दिशाहीन करण्याचे काम चालू आहे आणि कालच झालेल्या कणकवली येथे सभेमध्ये केंद्रीय मंत्री श्री.नारायणराव राणे यांनी सिडको प्राधिकरण कुठलीही जागा संपादन करणार नसल्याचे स्पस्ट केले आहे असे मोंडकर यांनी स्पष्ट केले आहे. आत्ता पर्यंत सिडकोच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एकही नागरिक विस्थापित झाला नाही आहे आपल्या जिल्ह्यातील सिंधुदुर्ग नगरी ओरोस सिडको महामंडळाने वसवण्यात मदत केली असून लवकरच त्या ठिकाणी ओरोस नगरपंचायत होईल.

सिडको महामंडळची जिल्ह्यची अधिसूचना नंतर बांधकाम परवानगीचे अधिकार सिडको महामंडळ च्या ताब्यात जाणार असा गैरसमज पसरविण्यात आला असून राज्य सरकारने क्रमांक : टीपीएस -1224/12/प्र.क.2/24/नवी -12 दिनांक 12/3/24 रोजीच्या महाराष्ट्राचे राज्यपाल याचे आदेशानुसार व नावाने निदेश पत्र जारी करून जिल्ह्यातील बांधकाम परवानगी नगर रचना विभाग कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कडेच असल्याचे निर्देशित केले आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रत्येक वेळी गैरसज पसरवणाऱ्या खासदार विनायक राऊत यांना जनता घरी बसवेल आणि कोकण चे भाग्यविधेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विजयी करून लोकसभेत पाठवेल असा विश्वास श्री बाबा मोंडकर प्रवक्ते भाजपा सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केला आहे. .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स