उज्वल भविष्यासाठी दादांच्या पाठीशी राहुया ; पंढरीनाथ मसुरकर यांचे प्रसिद्धी पत्राद्वारे आवाहन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे भंडारी समाज सेवा संघ माजी अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कोकणचे भाग्यविधाते असा उल्लेख करुन उज्वल भविष्यासाठी नारायण राणे उर्फ दादा यांना २०२४ लोकसभा निवडणूकीत खासदार म्हणून निवडून आणायचे आवाहन केले आहे.
ग्रामपंचायत दप्तरी मसुरे ग्रामपंचायत हे नाव पूर्ववत येण्याच्या शासन निर्णयास चालना मिळण्यासाठी तसेच मसुरे गांव तसेच आसपासच्या धार्मिक, नैसर्गिक व शाश्वत पर्यटनाला चालना मिळण्यासाठी केंद्रात मताधिक्य व एकंदर राजकीय पाठबळ आवश्यक आहे हे जाणून घेऊन व्हिजन असलेले नेतृत्व हे राणेच असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना आपला मताच्या माध्यमातून पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)