ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
ट्रोलिंग बाबत महेश मांजरेकर संतापले..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ट्रोलिंग बाबत महेश मांजरेकर संतापले..!

प्रकाशन: 27 Apr 2024 11:25 AM
वाचन संख्या 133

ब्यूरो न्यूज : सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल मराठीतील दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांचं मत मांडलं आहे. मी बनवलेला चित्रपट आवडला नसेल तर त्याबद्दल बोला, पण माझ्या बायको, आई किंवा मुलीबद्दल बोलायचा हक्क तुम्हाला कोणी दिला? असा प्रश्न महेश मांजरेकरांनी विचारला. यावेळी त्यांनी ट्रोलिंग रोखण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. संताप व्यक्त करताना ते म्हणाले की मला या गोष्टीचा भयंकर राग येतो. राग यायलाही हवा. लोक म्हणतात ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करा. पण दुर्लक्ष का करायचं? कोणी हक्क दिला तुम्हाला? मी काही तुमच्याबद्दल वैयक्तिक बोललो आहे का? मी एक चित्रपट बनवतो, तो तुम्ही पाहिला, तुम्ही तो पाहण्यासाठी पैसे मोजले, त्यामुळे त्याबद्दल बोलायचा तुम्हाला हक्क आहे. मला सिनेमा आवडला नाही आणि माझे पैसे फुकट गेले किंवा मला आवडला आणि माझे पैसे वसूल झाले. तुम्ही मला क्रिएटिव्हली क्रिटीसाईज केलं तर माझं काहीच म्हणणं नाही. कारण तुम्ही माझे प्रेक्षक आहात आणि मी तुमच्या आवडीचा आदर करतो. पण मी एखादी पोस्ट केली की माझी आई, वडील, माझी मुलगी, बायकोला बोलायचा हक्क कोणाला देत नाही व कोणीही देऊ नये. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

पुढे महेश मांजरेकर म्हणाले, “तुम्ही माझ्या कामाबद्दल जरुर बोला, पण दरवेळी माझ्या आईला का बोलता? मी तुम्हाला वैयक्तिक काही म्हणालो आहे का? एकदा तर माझ्या मुलीबद्दल मी इतकं वाईट काहीतरी लिहिलं होतं मी शोधलं त्याला आणि तक्रार केली होती. अशा लोकांना का माफ करावं? हे सर्व तेव्हाच संपेल जेव्हा सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करण्यासाठी एक कायदा तयार केला जाईल.”

यापूर्वी एकदा महेश मांजरेकरांनी गुढीपाडव्याला फॅमिली फोटो शेअर केला होता, त्यावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला त्यांनी सुनावलं होतं. तसेच त्याच्याविरोधात तक्रारही दिली होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स