मालवण नगरपरिषदेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी भरणा करण्यासाठी विशेष व्यवस्था.
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद कडून नागरीकांसाठी, सन २०२३ – २४ या वर्षातील चालू व थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरणा करण्याकरिता दिनांक २९, ३० व ३१ मार्च २०२४ या सुट्टीच्या कालावधीत देखील नगरपरिषदेचे कार्यालय सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत चालू ठेवण्यात येणार आहे. सुट्टीत नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
ज्या नागरिकांनी अद्याप घरपट्टी व पाणीपट्टी भरलेली नाही त्यांनी या कालावधीमध्ये आपला कर भरणा करून नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन मालवण नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)