आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यक्षेत्र श्री. मोरयाचा धोंडा येथे दुग्धाभिषेक.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण दांडी येथील पुण्यक्षेत्र श्री मोरयाचा धोंडा येथे काल २६ मार्चला आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला. आ. वैभव नाईक यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी शिवसेना ( उ. बा. ठा. ) तालुकाप्रमुख श्री. हरी खोबरेकर, सन्मेष उर्फ राजू परब, उमेश मांजरेकर, सौ. सेजल परब, सौ. पूनम चव्हाण, निनाक्षी शिंदे, हेमंत मोंडकर, सुर्वी लोणे, जयमाला मयेकर, अभ्यंकर यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)