ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
ग्रामपंचायत हद्दितील बंधार्याच्या तब्बल १८ प्लेटस् रातोरात गायब ; पळसंबचे माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केली सखोल चौकशीची मागणी.

ग्रामपंचायत हद्दितील बंधार्याच्या तब्बल १८ प्लेटस् रातोरात गायब ; पळसंबचे माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केली सखोल चौकशीची मागणी.

प्रकाशन: 20 Mar 2024 07:11 PM
वाचन संख्या 239

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ग्रामपंचायत पळसंब हद्दितल्या, खालची वाडी येथील ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ बंधार्याच्या तब्बल १८ प्लेटस् रातोरात गायब झाल्याची घटना माजी सरपंच व शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांच्या निदर्शनास आणली गेल्यानंतर, आज २० मार्चला त्यांनी आचरा पोलिस स्टेशन येथे धाव घेत, माजी सरपंच या नात्याने ग्रामस्थांच्यावतीने लेखी तक्रार अर्ज दिला आहे. माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी, ही घटना १९ मार्च रोजी रात्री उशीरा घडली व तिथल्या काही स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे.

या अर्जाद्वारे श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी, या घटनेमुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झालेले असून व्हाळात (ओहोळात) असलेला पाणीसाठा रिकामा होऊन शेतीसाठी व बागायतीसाठी लागणार्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला असल्याचे नमूद करत या घटनेची तत्काळ व सखोल चौकशी करुन संबंधीत अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी आचरा पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. या अर्जा संदर्भातील घटनेची चौकशी करण्याचे व कार्यवाही करायचे आश्वासन आचरा पोलिस निरीक्षक यांनी दिले असल्याची माहिती माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 15
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 321

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स