ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
उद्योजक श्री. राजन आंगणे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.

उद्योजक श्री. राजन आंगणे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.

प्रकाशन: 19 Mar 2024 04:55 PM
वाचन संख्या 415

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री राजन आंगणे यांच्या पार्थिवावर आज १९ मार्चला मालवण मधील दांडी स्मशानभूमी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. श्री राजन आंगणे ( वय : ५९ वर्षे ) यांचे काल१८ मार्चला अकाली निधन झाल्याचे वृत्त समजताच विविध स्तरांतून शोक व्यक्त होत आहे. आज सकाळी मालवण वायरी येथील श्री कलावती मंदिर नजिक त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी अडिच वाजता दांडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत श्री. राजन आंगणे यांचे ज्येष्ठ बंधू श्री आनंद आंगणे यांनी पार्थिवाला विधीवत मुखाग्नी दिला. यावेळी आंगणे कुटुंबिय मंडळाचे अध्यक्ष श्री भास्कर आंगणे, मधुकर आंगणे, सीताराम आंगणे, विनय आंगणे, नंदू आंगणे, सतिश आंगणे, अर्जुन आंगणे, बाबू आंगणे, समीर आंगणे, सुधा आंगणे, प्रसाद आंगणे व आंगणे कुटुंबीयांसह विविध स्तरांतील प्रतिष्ठीत व्यक्ती, उद्योजक, व्यापारी तसेच सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आजी – माजी लोकप्रतिनिधी, मित्रपरिवार आणि जिल्हावासिय, मालवणवासिय व मसुरे ग्रामस्थ उपस्थित होते. तत्पूर्वी आमदार वैभव नाईक, युवानेते संदेश पारकर, ज्येष्ठ नेते प्रभाकर सावंत, उद्योजक दत्ता सामंत व इतर राजकीय मान्यवर व उद्योजक यांनी राजन आंगणे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

दिवंगत श्री राजन आंगणे यांच्या शोकसभेत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे माजी आमदार विनय नातू, पिंपर गांवचे माजी सरपंच मोरे, श्री. मधुकर आंगणे, नयन महाजन, रविकिरण तोरसकर यांनी राजन आंगणे यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि श्रद्धांजली वाहिली. राजन आंगणे यांच्या अचानक जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाल्याची आंगणे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली तर नेहमी सर्वांना उद्योजकतेसाठी व माणुस म्हणून ताठ मानेने जगण्यासाठी प्रेरणा देणारे योगी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना उपस्थित मित्रपरिवाराने व्यक्त केली.

यावेळी मालवण दांडी येथील स्मशानभूमीत कै. राजन आंगणे यांचे ज्येष्ठ बंधू श्री आनंद आंगणे, पुतण्या अमेय आंगणे, आंगणे कुटुंबीय मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, विनय आंगणे, नंदू आंगणे व आंगणे कुटुंबीय तसेच माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, मालवण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, मच्छिमार नेते व माजी जि प सदस्य हरी खोबरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, सामाजिक कार्यकर्ते विजय चव्हाण, शेखर गाढ, उमेश मांजरेकर, छोटू सावजी, सूर्यकांत फणसेकर, किशोर खानोलकर, चेतन वाळके, नितीन खानोलकर, मनोज मोंडकर, मंदार ओरसकर, मयूर पारकर, राजेश कुडाळकर, परशुराम पाटकर, मयू पाटकर, रविकिरण तोरसकर, अजय पोयेकर, मसुरे येथील ज्येष्ठ पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर व अन्य मान्यवर तसेच अनेक मालवणवासिय, उद्योजक आणि राजन आंगणे यांचे निकटवर्तीय व मित्रपरिवार उपस्थित होते. शोकसभेनंतर उपस्थित सर्वांनी २ मिनिटे स्तब्धता पाळून श्री. राजन आंगणे यांना श्रद्धांजली वाहिली.

मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे २७ मार्चला कै. राजन आंगणे यांचे दशक्रीया विधी संपन्न होतील अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने यावेळी देण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 303

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स