ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कै.कल्याणराव इंगळेंच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

कै.कल्याणराव इंगळेंच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 17 Mar 2024 03:01 PM
वाचन संख्या 71

कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात संपन्न होणार कार्यक्रम.

अक्कलकोट | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे माजी चेअरमन कै. कल्याणराव इंगळे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणा निमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा, विशेष सत्कार समारंभ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. सदर कार्यक्रम दिनांक १८ मार्च रोजी देवस्थानच्या मैंदर्गी – गाणगापूर रोडवरील कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात संपन्न होतील. दिनांक १८ मार्च रोजी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा इत्यादी कार्यक्रमांचे शुभारंभ सकाळी १० वाजता
येथील विरक्त मठाचे मठाधिपती म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी, प.पू.चोळप्पा महाराजांचे वंशज प. पू. अण्णू महाराज,
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईचे आंतरराष्ट्रीय संबंध व परराष्ट्र धोरण अभ्यासक तसेच महाराष्ट्र उच्च शिक्षण विभागाचे संचालक मा.डॉ.शैलेंद्र देवळाणकर व अमरावती येथील पूज्य ज्योतिषाचार्य ह. भ. प. सागर महाराज देशमुख (वकील) आळंदीकर यांच्या हस्ते संपन्न होईल.

कै. कल्याणराव इंगळे यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त अमरावती येथील पूज्य ज्योतिषाचार्य ह. भ. प. सागर महाराज देशमुख (वकील) आळंदीकर यांच्या शुभहस्ते डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा विशेष सत्कार समारंभ संपन्न होईल. कै. कल्याणराव इंगळेंच्या या पुण्यस्मरणानिमित्त छोट्या पडद्यावरील मराठी मालिकेचे अभिनेते अथर्व कर्वे यांचा विशेष कार्यक्रम तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शाहीर मा.डॉ.शाहीर आझाद नाईकवाडी हे कै.कल्याणराव इंगळे यांच्या जीवन कार्यावर पोवाडा सादर करतील, तरी गरजुंनी रोजगार मेळावा, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, आदी कार्यक्रमांसह या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अन्य कार्यक्रमांचा व भोजन प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे व कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 331

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स