ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र तर्फे ३० शाळांना ६० लॅपटाॅपची भेट.

दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र तर्फे ३० शाळांना ६० लॅपटाॅपची भेट.

प्रकाशन: 12 Mar 2024 04:03 PM
वाचन संख्या 80

मसुरे | प्रतिनिधी : अपरिचित गडकोटांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठान च्या वतीने CSR प्रोजेक्ट अंतर्गत मॉर्निंग स्टार कंपनीच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यातील गडघे-यांमधील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने लॅपटॉप वाटप सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लॅपटॉप मागणी केलेल्या ३० शाळांना त्यांच्या पटसंख्येनुसार ६० लॅपटॉप चे वितरण ११ मार्चला मालवण तालुक्यातील रामगड हायस्कूल येथे करण्यात आले.

यावेळी दुर्गवीर प्रमुख श्री. संतोष हासुरकर यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या कार्याची माहिती देत दुर्गवीर प्रतिष्ठान सोबत गडकिल्ले संवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुलांना मोठ्या संख्येने लॅपटॉप करण्यामागचा हेतू हाच आहे की ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक साहित्य उपलब्ध व्हावे जेणेकरून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल आणि भावी पिढी डिजिटली साक्षर होण्यास मदत होईल, असे मत श्री. हासुरकर यांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षकांच्या वतीने दुर्गवीरप्रमुख श्री. संतोष हासुरकर यांच्या सह इतर दुर्गवीरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर रामगड सरपंच श्री. शुभम मठकर,दुर्गवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. संतोष हासुरकर, श्री.अभय प्रभुदेसाई, रामगड हायस्कूल चे श्री. वळंजू सर, रामगड शाळा संस्था उपाध्यक्ष श्री.सुभाष तळवडेकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन तर्फे सर, दुर्गवीर सचिव श्री.सागर टक्के, खजिनदार श्री. सुरेश उंदरे, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. अर्जुन दळवी, रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत डिंगणकर, दुर्गवीर सदस्य श्री. महेश सावंत, प्रमोद डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स