ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आंगणेवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा बॅन्क व नाबार्ड यांच्या वतीने आयोजीत महिला बचत गट उत्पादित साहित्य विक्री व  प्रदर्शनाचे उद्गाटन.

आंगणेवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा बॅन्क व नाबार्ड यांच्या वतीने आयोजीत महिला बचत गट उत्पादित साहित्य विक्री व प्रदर्शनाचे उद्गाटन.

प्रकाशन: 01 Mar 2024 11:52 PM
वाचन संख्या 299

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथे भराडी देवी यात्रोत्सव २०२४ च्या पूर्वसंध्येला ‘सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने बचतगट महिलांनी बनविलेल्या वस्तुंच्या विक्री प्रदर्शनाचे उदघाटन आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हा बॅन्क उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी श्रीफळ फोडून तर संचालिका नीता राणे यांनी फीत कापून केले. यावेळी जिल्हा बॅन्क अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्य अधिकारी प्रमोद गावडे, नाबार्ड चे अजय थिटे, भाजप नेते अशोक सावंत, नीता राणे, सौ. सरोज परब, श्री पवार, बिळवस सरपंच सौ मानसी पालव, बाबू आंगणे, मेघनाद धुरी, उद्योजक दीपक परब, महेश बागवे, विलास मेस्त्री, संतोष पालव, देऊळवाडा सरपंच सुरेखा वायंगणकर, किशोर गोवेकर, पी. डी. सामंत, के. बी. वरक तसेच जिल्हा बँक अधिकारी, शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेली १२ वर्ष बचतगट उत्पादित साहित्य विक्रीचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले जाते. जिल्हा बँकेच्या पाठिंब्यातून बचतगटांनी स्वतःचे हक्काचे सुपर मार्केट सुरू करावे. ते देशात पहिले केंद्र असेल. ३६५ दिवस व्यवसाय केल्यास दरडोई उत्पन्न सुद्धा वाढेल. सुपर मार्केट ला जिल्हा बँक व नाबार्ड चे सहकार्य निश्चित मिळेल. काळानुसार पुढील टप्पा या प्रदर्शनाच्या विस्तारातून करायला हवा. तंत्रज्ञान बदलत असताना बचत गटांनी बदल केला पाहिजे. अतिशय चांगले पदार्थ बचतगटाच्या माध्यमातून बनवले जात आहेत. हे प्रदर्शन आणखी विस्तारित व्हावे. मुंबई मार्केट उपलब्ध झाल्यास चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल. खासदार नारायण राणे साहेब केंद्रात आहेत त्यामुळे सतेचा वापर करून बचत गटांना सक्षम करूया असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले की जिल्ह्यात उत्पादित माल राज्यात पोचला पाहिजे. गेल्या वर्षी ६२ लाखापर्यंत विक्रीचे उद्दिष्ट गाठले आहे. इ कॉमर्स च्या माध्यमातून महिलांनी स्वतःचा प्रयत्न करून चांगले उत्पादन बनवावे. मार्केटिंग सुद्धा चांगले होणे आवश्यकआहे. नाबार्डचे नेहमी सहकार्य बँकेला लाभते. मुंबई मध्ये सुद्धा जिल्हा बँक व नाबार्ड च्या सहाय्यातून  प्रदर्शन आयोजित करण्यात येईल. यावर्षी १ कोटींचा विक्रीचा टप्पा गाठूया असेही ते म्हणाले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स