'प्रथम ती' मालवण सौभाग्यवती आणि लकी ड्राॅ स्पर्धेची घसघशीत बक्षिसे जाहीर ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुका व शहर यांच्या वतीने आयोजीत बंदर जेटी येथे उद्या ५ वाजता रंगणारी भव्य स्पर्धा.
जास्तीत जास्त महिला, युवती व सौभाग्यवती यांनी स्पर्धेला उपस्थित रहायचे तालुका प्रमुख श्री. हरी खोबरेकर यांचे आवाहन.
मालवण | सुयोग पंडित : मालवण बंदर जेटी येथेउद्या २२ फेब्रुवारी २०२४ ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुका व शहर व महिला आघाडी यांच्या वतीने आयोजीत ‘प्रथम ती सौभाग्यवती व लकी ड्राॅ स्पर्धेसाठी घसघशीत बक्षिसे जाहीर झाली आहेत. खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुखसंदेश पारकर, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत व युवती सेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक रुची राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी २२ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजल्यापासून मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी ‘प्रथम ती मालवण सौभाग्यवती’ स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी हळदीकुंकू समारंभ, फनी गेम्स व लकी ड्रॉ चे आयोजनह करण्यात आले आहे.
या भव्य कार्यक्रमातील लकी ड्राॅ मधील भाग्यवान विजेत्यांसाठी प्रथम क्रमांक सोन्याची नथ, द्वितीय क्रमांक गॅस स्टोव्ह आणि तृतीय क्रमांकासाठी फॅन अशी आकर्षक बक्षीसे जाहीर झाली आहेत.
प्रथम ती सौभाग्यवती स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेतीला ४३ इंची स्मार्ट टिव्ही, द्वितीय क्रमांकासाठी एअर कूलर तर तृतीय क्रमांकासाठी मिक्सर अशा घसघशीत बक्षिसांची घोषणा झाली आहे.
तरी तालुक्यातील व शहरातील जास्तीतजास्त महिला, युवती व सौभाग्यवती यांनी या स्पर्धेत सहभागी व्हायचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, महिला आघाडी समन्वयक सौ. पूनम चव्हाण यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)