ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
शिरगांव गांवचे जागृत ग्रामदैवत श्री पावणाई देवीच्या ७ प्रहरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ; पावणा देवी विश्वस्त मंडळ, बारा - पाच मानकरी, ग्रामस्थ मंडळी यांचे उपस्थितचे आवाहन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शिरगांव गांवचे जागृत ग्रामदैवत श्री पावणाई देवीच्या ७ प्रहरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ; पावणा देवी विश्वस्त मंडळ, बारा - पाच मानकरी, ग्रामस्थ मंडळी यांचे उपस्थितचे आवाहन.

प्रकाशन: 18 Jan 2024 05:09 PM
वाचन संख्या 107

शिरगांव | सहसंपादक ( संतोष साळसकर ) :
प्रत्येक माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारी व भक्तांच्या नवसाला पावणारी, जागणारी, असा नावलौकिक असलेल्या देवगड तालुक्यातील शिरगांव गावचे जागृत ग्रामदैवत श्री पावणाई देवीचा सात प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताह रविवारी २१ जानेवारी २०२४ ला पारंपरिक रीतीरिवाजाप्रमाणे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

देवगड – निपाणी राज्यमार्गावर शिरगांव हे गाव आहे. या गावाला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, कलात्मक वारसा लाभलेला आहे. या गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीचे सुरेख असे आकर्षक देवालय आहे. या देवालयाचा परिसर अतिशय प्रसन्न आणि आल्हादायक आहे. या मंदिराचे सुशोभीकरण आणि पावित्र्य बघून येणाऱ्या भाविकांचे मन तृप्त होते. दरवर्षी पौष महिन्याच्या पुत्रदा एकादशी दिवशी या देवालयात थाटामाटात साजरा होणाऱ्या हरिनाम सप्ताहास जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक उपस्थित रहातात . तसेच नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी, माहेरवाशिणी, भाविक कृपाशीर्वादासाठी याठिकाणी आवर्जून येतात. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील व्यापारी, महिला बचतगट छोटेखानी दुकाने थाटतात. तसेच या उत्सवादिवशी मंदिरपरिसरत आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते.

या हरिनाम सप्ताहास जास्तीतजास्त भाविकांनी, भजनी मंडळांनी उपस्थित राहून हरिनामाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री पावणा देवी देवालय विश्वस्त मंडळ, बारा-पाच मानकरी, ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स