ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी महाराष्ट्र राज्याचे सा. बां. मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले पत्र ; श्री दांडेश्वर मंदिर ते बंदर जेट्टी वाहनतळ असा धूप प्रतिबंधक बंधरा वजा रोड निर्मितीची मागणी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी महाराष्ट्र राज्याचे सा. बां. मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले पत्र ; श्री दांडेश्वर मंदिर ते बंदर जेट्टी वाहनतळ असा धूप प्रतिबंधक बंधरा वजा रोड निर्मितीची मागणी.

प्रकाशन: 06 Jan 2024 10:43 PM
वाचन संख्या 174

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरचे युवा नेतृत्व व भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी मालवण समुद्र किनार्यावरील, श्री दांडेश्वर मंदिर ते मालवण बंदर जेट्टी वाहनतळ याठिकाणी धूप प्रतिबंधक बंधरा कम रोड होणे बाबतचे पत्र महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले. भारताच्या नकाश्यावर मालवण शहर हे पर्यटन दृष्ट्या मुख्य केंद्र बिदू ठरत आहे व मालवणात अजून पर्यटन वाढी करीता मालवणचे विकास होणे गरचेचे आहे. ४ डिसेंबर २०२३ ला भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण राजकोट येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यामुळे मालवण शहरात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. मालवण बंदर जेट्टी ते मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिरा पर्यंत कोस्टल रोड होणे ही आजची गरज आहे असे या पत्रात नमूद केले आहे.

ह्या मार्गामुळे मालवण बंदर जेटीवर आलेले पर्यटक कोस्टल रोडच्या साह्यानें समुद्राच्या लाटांचे अनंत घेत दांडेश्वर मंदिरापर्यंत जाऊ शकतात. किनारपट्टी भागाला काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. ह्या मार्गामुळे किनारपट्टी भाग देखील स्वच्छ राहू शकतो तर किनार पट्टी भागाचे मुख्य व्यवसाय म्हणजे मच्छिमारी कोस्टल रोड मुळे मच्छिमारांना मोठ्या वाहनांमध्ये मासे भरणे देखील सोपे होईल. मालवण शहरातील दांडी परिसरात अतिदृष्टी वेळी किंवा समुद्राला उधाणाच्या वेळेस समुद्राचा पाणी वस्तीत येत असतो ह्या कोस्टल रोड मुळे हे देखील बऱ्या प्रमाणात कमी होईल. हा रोड अस्तित्वास आल्यास मालवण शहरात पर्यटनाच्या दृष्टीने अजून एक चालना भेटणार आहे. तरी हे धूप प्रतिबंधक बंधरा कम रोड लवकरात लवकर मंजूर करावे असे पत्रात म्हंटले आहे.
या वेळी भारतीय जनता युवा मोर्चा तथा भाजयुमोचे सिंधुदुर्ग उपाध्यक्ष राकेश सावंत व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स