ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राज्य ग्रामसेवक संघटनेच्या संपूर्ण बिनविरोध निवड प्रक्रियेतून सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी प्रशांत वर्दम ; सरचिटणीस पदी संतोष पालव तर कोषाध्यक्ष सुनील प्रभूदेेसाई.

राज्य ग्रामसेवक संघटनेच्या संपूर्ण बिनविरोध निवड प्रक्रियेतून सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी प्रशांत वर्दम ; सरचिटणीस पदी संतोष पालव तर कोषाध्यक्ष सुनील प्रभूदेेसाई.

प्रकाशन: 02 Jan 2024 06:11 AM
वाचन संख्या 128

ओरोस | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई १३६ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग च्या जिल्हाध्यक्ष पदी कणकवली येथील ग्रामसेवक प्रशांत मधुकर वर्दम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर जिल्हा सरचिटणीस पदी कुडाळ तालुक्यात संतोष सुधाकर पालव यांची बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना जिल्हा शाखा सिंधुदुर्ग ची पंचवार्षिक निवडणूक ३१ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था कार्यालय ओरोस येथे पार पडली. यावेळी उपाध्यक्ष श्री संदिप रमाकांत गवस सावंतवाडी, कार्याध्यक्ष श्री प्रसाद विजय ठाकुर – सावंतवाडी, महिला उपाध्यक्ष, श्री रेश्मा गोवळकर, देवगड, कोषाध्यक्ष श्री सुनील प्रभुदेसाई मालवण, सहसचिव, प्रविण नेमण वेगुर्ला, संघटक उज्वल झरकर- देवगड, महिला संघटक, सुजाता जगताप दोडामार्ग, कायदेविषयक सल्लागार श्री शशिकांत गुरव वैभववाडी यांची निवड करण्यात आली.

या निवडणुक प्रकियेत श्री पुरूषोत्तम नारायण हरमलकर यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहीले, या सोबत मावळते जिल्हाध्यक्ष श्री संतोष तुकाराम गावडे, मावळते सरचिटणीस श्री गणेश बागायतकर, ग्रामसेवक पतसंस्था चेअरमन श्री अमित दळवी, व्हा चेअरमन श्री नितेश तांबे, मावळते जिल्हा कार्यकारीणी सदस्य श्री मनमोहन धुरी, श्री मंगेश राणे, व सर्व तालुका अध्यक्ष,सचिव व जिल्हयातील बहुसंख्य ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी बहुसंख्य ग्रामसेवक व महिला वर्ग उपस्थित होते. यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष श्री संतोष तुकाराम गावडे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार जिल्हा संघटनेमार्फत करणेत आला. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत वर्दम यांनी जिल्हयातील सर्व ग्रामसेवकांचे प्रलबिंत प्रश्न, अडीअडचणी सोडवणे व जिल्हा संघटना एकसंघ ठेवणे हे प्रमुख उददीष्ट आहे. तसेच जिल्हयातिल ग्रामसेवकांच्या हीताचे सर्व निर्णय करण्यात येतील या बाबतची ग्वाही आपल्या अध्यक्ष भाषणात दिली. यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष श्री संतोष तुकाराम गावडे सरचिटणीस श्री गणेश बागायतकर व चेअरमन अमित दळवी यांनी ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 300

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स