ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आता केंद्रातर्फे मिळणार बालशक्ती व बालकल्याण पुरस्कार...!

आता केंद्रातर्फे मिळणार बालशक्ती व बालकल्याण पुरस्कार...!

प्रकाशन: 14 Oct 2021 02:20 PM
वाचन संख्या 56

ओरोस | प्रतिनिधी : केंद्र शासनार्फे देण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार व राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कारांच्‍या ऐवजी बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार हे पुरस्कार देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. केवळ बाल शक्ती पुरस्कारासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 15 ऑक्टोंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी पर्यत ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अशी माहिती सोमनाथ रसाळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली.

बाल शक्‍ती पुरस्‍कारासाठी ज्या मुलांनी वय वर्ष 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यापुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुर्णपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

बाल शक्ती पुरस्कार करिता केंद्र शासनाने अर्ज मागविण्यात आले असून या पुरस्काराची नियमावली व निकष केंद्र शासनाच्या www.wcd.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी 02362-228869 या क्रमाकावर संपर्क साधावा. प्रस्ताव हे www.nca-wcd.nic.in या संकेत स्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. तरी या संदर्भात इच्छुकांनी परस्पर ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन सोमनाथ रसाळ जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

    

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स