ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
शिवसेना ( उ.बा.ठा.) मालवण उपतालुकाप्रमुख पदी उदय दुखंडे व पराग नार्वेकर ; आचरा विभाग समन्वयक पदी मंगेश जिजा टेमकर व पप्पू परुळेकर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शिवसेना ( उ.बा.ठा.) मालवण उपतालुकाप्रमुख पदी उदय दुखंडे व पराग नार्वेकर ; आचरा विभाग समन्वयक पदी मंगेश जिजा टेमकर व पप्पू परुळेकर.

प्रकाशन: 23 Dec 2023 08:01 AM
वाचन संख्या 135

आमदार वैभव नाईक व माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर यांनी केले अभिनंदन व दिल्या शुभेच्छा ; माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी व अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनीही केले अभिनंदन.

मालवण | प्रतिनिधी : आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मालवण तालुका कार्यकारिणीची बैठक गुरुवारी मालवण शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. यावेळी शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुखपदी उदय दुखंडे व पराग नार्वेकर यांची निवड करण्यात आली. तर आचरा विभागाच्या शिवसेना समन्वयक पदी मंगेश उर्फ जिजा टेमकर व पप्पू परुळेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या निवडीनंतर आमदार वैभव नाईक व माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहर प्रमुख बाबी जोगी,उपशहर प्रमुख सन्मेष परब,महेश जावकर, उपजिल्हा संघटक सेजल परब, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, तालुका प्रमुख दिपा शिंदे, शहर प्रमुख रश्मी परुळेकर, देवयानी मसुरकर, आडवली मालडी विभागप्रमुख बंडू चव्हाण, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, मसुरे विभागप्रमुख राजेश गांवकर, पेंडूर विभाग प्रमुख कमलाकर गावडे, पोईप विभाग प्रमुख विजय पालव,संतोष घाडी, बाळ महाभोज, पंकज वर्दम, मनोज मोंडकर, भाई कासवकर,अरुण लाड, सुभाष धुरी,राजू मेस्त्री, निनाक्षी शिंदे व शिवसेना, युवासेना, आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स