पळसंब गांवचे मुख्य मानकरी श्री अण्णा कापडी व परिवाराने दिली २ लाखांची देणगी ; श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन चॅरिटेबल ट्रस्टने मानले जाहीर आभार.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवचे मुख्य मानकरी श्री अण्णा कापडी व परिवाराने श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन चॅरिटेबल ट्रस्टला २ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश दिला. काल झालेल्या सभेमध्ये श्री अण्णा कापडी यांनी त्यांच्या २७ वर्षांचा लेखाजोखा मांडताना त्यांची २७ वर्षांत साठवलेली पूंजी देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या समाज हीतकारी उपक्रमांसाठी अर्पण केली.
मुख्य मानकरी श्री अण्णा कापडी हे श्री जयंतीदेवीचे निःसिम भक्त आहेत व गावांतील सुधारणा, प्रगती यासाठी कापडी कुटुंब नेहमीच मनोभावे कार्यरत असते. या देणगी बद्दल पळसंब ग्रामस्थ व श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन चॅरिटेबल ट्रस्टने श्री अण्णा कापडी व त्यांच्या परिवाराचे जाहीर आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.