कु. स्वरा बांदेकरची नॅशनल अबॅकस स्पर्धेसाठी निवड ; बांदा केंद्रशाळेची विद्यार्थीनी.
बांदा | राकेश परब : प्रोऍक्टिव्ह अबॅकस कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत जिल्हा परिषद बांदा क्र.१ केंद्र शाळेत इयत्ता चौथीत शिकणारी व बांदा येथील एकलव्य अबॅकस क्लासची विद्यार्थिनी कु. स्वरा दीपक बांदेकर हिने विभागीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून २५जानेवारी २०२४ मधील नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कु. स्वरा हिला बांदा येथील एकलव्य अबॅकस च्या शिक्षिका स्नेहा केसरकर हिचे मार्गदर्शक मिळत आहे. स्वराने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे उपाध्यक्ष संपदा सिध्दये मुख्याध्यापिका उर्मिला मोर्चे, केंद्र प्रमुख संदीप गवस यांनी अभिनंदन केले आहे.या विद्यार्थ्यांनीला बांदा केंद्र शाळेतील शिक्षक शांताराम असनकर,सपना गायकवाड,स्नेहा घाडी,रसिका मालवणकर, रंगनाथ परब,जे.डी.पाटील, प्रदिप सावंत, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, मोरे व वडील दिपक बांदेकर व आई साक्षी बांदेकर यांचे वर्गाचे मार्गदर्शन लाभले. स्वराने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.